'Image Consulting' म्हणजे काय?

मी Image Consultant आहे असं सांगितलं की बर्‍याच लोकांचा प्रश्न असतो, 'म्हणजे काय?' 
मग Image Consulting म्हणजे काय आणि त्यात काय काय केलं जात याची त्यांना माहिती दिली की 'अरे, हे एकदम नवीन आहे' अशी प्रतिक्रिया मला मिळते. काही वेळा जेव्हा मी वर्कशॉप्स घेते, तेव्हा मराठीत घेणार आहेस का? अशीही विचारणा होते. तेव्हा असा विचार मनात आला की या विषयावर एक मराठीत ब्लॉग सुरु करायला हरकत नाही जेणेकरून सर्वसामान्य मराठी माणसांपर्यंत या विषयाची माहिती पोहोचवता येईल .

तर आज आपण Image Consulting म्हणजे काय हे थोडक्यात  समजून घेऊ.

Image Consulting हे असं क्षेत्र आहे ज्यात Consultants तुमचं व्यक्तिमत्व चारचौघात ठळकपणे उठून दिसण्यासाठी तुम्हाला मदत करतात. कुणाही व्यक्तीचं व्यक्तीमत्व हे ती व्यक्ती स्वतःला कशी प्रेझेंट करते, काय कपडे घालते, लोकांशी कशी वागते, कशी बोलते या गोष्टींवर अवलंबून असतं आणि याच सगळ्या गोष्टींत Consultants तुम्हाला मदत करत असतात.

एक Image Consultant म्हणून मी माझ्या क्लायंटचं सध्याचं व्यक्तीमत्व, पद, कार्यक्षेत्र, ध्येय आणि प्रसंग या सगळ्यांचा विचार करून त्यांना Dressing, Grooming, Body Language, Business and Social Etiquette या सगळ्यांत मदत करते.


Professional Imageया पुढील भागांत आपण 'आपले व्यक्तिमत्व आणि त्याचे इतरांवर होणारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम' या विषयी सविस्तर माहिती घेऊ.

Comments

Post a Comment