उठावदार व्यक्तीमत्वासाठी - Factors help you to define your Image - Part 1

मागच्या भागात आपण इमेज म्हणजे काय हे पाहिलं आता या भागात आपण कुठले पैलू आहेत जे आपली इमेज किंवा आपलं व्यक्तिमत्व उठावदार बनवतात हे पाहू.

सगळ्यात आधी आपली इमेज उठावदार करण्यासाठी काम झालं पाहिजे ते म्हणजे  काही आंतरिक बाबींवर. या आंतरिक बाबी खालील प्रमाणे -

१)  आरोग्य - 'आरोग्यं धन संपदा' असं  आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी तुमचं आरोग्य छान असणं खूपच महत्वाचं आहे. तुमचं ड्रेससिंग छान असेल, स्वतःला छान ग्रूम करत असाल पण जर तुमचं आरोग्य साथ देत नसेल तर तुमचं व्यक्तिमत्व तितकसं उठावदार राहणार नाही. त्यासाठीच तुमचं आरोग्य चांगले असणं खूप महत्वाचे आहे. उत्तम आरोयग्यासाठी पौष्टिक आहार, नियमित व्यायाम यावर आणि शांत झोप यावर भर दिला गेला पाहिजे.

२) सकारात्मक विचार - तुमचे विचार जर सकारात्मक असतील तर तुम्ही कुठल्याही प्रसंगाला धैर्यानं तोंड देऊ शकता. तुमचे सरकारात्मक विचार तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहेत. यासाठी तुमच्यापुढे असलेल्या समस्यांचा विचार करण्यापेक्षा त्यावर तोडगा काढायचा मार्ग शोधण्यावर कायम भर द्यावा.

३) तुमचं ज्ञान -  तुमच्या कामाबद्दल असलेली माहिती, त्यातलं सखोल ज्ञान यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच पण त्याच बरोबर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. यासाठी सतत तुमच्या विषयाशी निगडित असलेली माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून जसे पुस्तके, internet, तज्ञ लोकांची व्याखाने यामधून मिळवत राहणे गरजेचे आहे.

या तीनही गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहेत. या सगळ्यांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःवर विश्वास असणारी व्यक्ती दुसऱ्यावर नक्कीच चांगला प्रभाव पाडू शकते.






Comments

Popular Posts