उठावदार व्यक्तीमत्वासाठी - Factors help you to define your Image - Part 2

मागच्या भागात आपण कुठल्या आंतरिक बाबी आहेत ज्या तुमची इमेज उठावदार करायला उपयुक्त ठरतात हे पाहिलं. तुमची inner personality तितकीच महत्वाची आहे जितकी तुमची outer personality.

बाह्य व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो. पण चांगले कपडे, सौंदर्य प्रसाधनं या पलीकडे फारशी माहिती सगळ्यांनाच असते असं नाही. त्यामुळे आपण व्यक्तिमत्वासाठी काय करू शकतो किंवा केल पाहिजे हे पाहू.

पोशाख

पहिली गोष्ट म्हणजे आपला पोशाख. व्यकितमत्व उठून दिसण्यासाठी आपण काय घालतो, कसं घालतो हे फार मह्त्वाचं असतं. आपला पोशाख आपल्याला उठून दिसणे खूपच महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे आपला पोशाख हा आपला कामाचा हुद्दा, कामाचे कारण, तिथे आपली भूमिका, समारंभ असेल तर कोणता समारंभ, तिथली आपली भूमिका या सगळ्यांचा विचार करून निवडला पाहिजे.

formal आणि casual या मधला फरक माहित असणे अतिशय आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र जाण्याचे dresses हे वेगळे असले की त्यात तोचतोचपणा येत नाही. आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व पण उठून दिसतं.

Related image

जेव्हा मी personal consultation करते तेव्हा या सर्व बाबींचा विचार करून client ला मी पर्याय सुचवत असते. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा हुद्दा या सगळ्यांचा विचार करून, त्यांना काय चांगलं दिसेल याचा विचार केला जातो.

याबरोबरच पोशाखाचा रंग, त्याचा पोत आपल्याला शोभतो का? हेही पाहणे गरजेचं आहे. प्रत्येकाचा स्वतःचा असा Skin Tone असतो. color analysis मध्ये तुमचा Skin Tone कोणता हे मला सांगता येते. एकदा तो समाजाला की dress चा रंग निवडणे एकदम सोपे होऊन जाते आणि निवडलेला रंग आपल्यावर छानच दिसतो.

Related image

रंगाबरोबरच एक महत्वाची गोष्टं म्हणजे तुमचा body shape. प्रत्येकाचा body shape वेगळा असतो.  फक्त आपला कुठला हे महित असलं की काय घातलं तर आपल्याला चांगलं दिसेल याचा अंदाज तुम्हाला येतो.
body shape नुसार dressing असेल तर व्यक्तिमत्व अजून खुलून दिसते.

Image result for bodyshape


पोषाखाबरोबरच अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर आपण काम केल तर आपलं व्यक्तिमत्व उठून दिसेल ते आपण पुढच्या भागात पाहू...Comments