'Image' म्हणजे काय

या भागात आपण इमेज म्हणजे काय हे पाहू. 

बरेच वेळा आपण ऐकतो किंवा म्हणतो की 'माझ्या इमेजला साजेसं', 'माझ्या इमेजला धरून' किंवा अगदी खेळीमेळीत 'माझ्या इमेजचा सवाल आहे' वगैरे, पण म्हणजे नक्की काय?

Personal Image

एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं, तर इमेज म्हणजे इतरांचं तुमच्या बद्दल असलेलं मत. एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्या बद्दल असलेली प्रतिमा म्हणजे तुमची Personal Image. तुम्हाला माहीत आहे का, आपण कोणत्याही व्यक्तीला पाहिल्यांदा भेटतो तेव्हाच त्या व्यक्तीचं आपल्या बद्दलचं प्रार्थमिक मत तयार झालेल असतं. आणि हे मत तयार व्हायला त्या व्यक्तीला फक्त ७ सेकंद लागतात. म्हणजे पहिल्या ७ सेकंदात ती व्यक्ती तुमच्या बद्दल तिचं सर्वसाधारण मत बनवून टाकते. म्हणूनच काही वेळा 'First impression is the last impression' हे खरे ठरते. 

आता या ७ मिनिटांमध्ये या व्यक्तीला आपल्याबद्दल नक्की काय समजत असेल याचा विचार आपण करू. 


१. तुमचं कार्याक्षेत्रातील पद
२. तुमचं कार्यक्षेत्रातील यश 
२. तुमची आर्थिक परिस्थिती
३. तुमची हुशारी. 
४. तुमची विश्वासार्हता. 
५. आणि तुमचा स्वतःवरील विश्वास

या सगळ्या गोष्टी जेव्हा समोरील व्यक्तीच्या मनाला पटतात तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व त्या व्यक्तीनुसार उठावदार असतं. 

आपलं व्यक्तिमत्व उठावदार व्हायला कुठले पैलू आहेत ज्यावर आपण काम कारण गरजेच आहे ते आपण पुढच्या भागात पाहू.


Website: www.rutujasimageconsulting.com

FB: www.facebook.com/RutujaKantakImageConsultant


Comments

Popular Posts