उठावदार व्यक्तीमत्वासाठी - Factors help you to define your Image - Part 3
मागे पाहिल्या प्रमाणे तुमच्या पोशाखामुळे ज्याप्रमाणे तुमची पर्सनॅलिटी उठून दिसते त्याच प्रमाणे त्याला साजेसं ग्रूमिंग असलं की त्याला छान उठाव येतो.
ग्रूमिंग ही एक कला मानली जाते जी स्वतःला नीटनेटके ठेवायला मदत करते. तुम्ही कसे उपस्थित राहता, कश्या प्रकारे सादरीकरण करता या सर्वांसाठी स्वतः नीटनेटके असणे अतिशय आवश्यक आहे.
तुमची वैयक्तिक स्वच्छता, त्वचा, नखं, केस या सगळ्यांची योग्य ती काळजी घेणे, प्रसंगानुरूप योग्य केशरचना, पोशाख असणे म्हणजे ग्रूमिंग. या सगळ्या बरोबरच सौम्य Deo किंवा perfume वापरणे उत्तम.
सध्या ग्रूमिंग हे फक्त स्त्रियां पर्यंत मर्यादित नाही तर पुरुषही आज well groomed असतात. स्त्रियां इतकेच पुरुषही स्वतःला कश्या प्रकारे present करायचं याचा विचार करताना दिसतात. परंतू सध्याचे असलेले ट्रेण्डस , आपलं व्यक्तिमत्व आणि उद्देश हे सर्व गृहीत धरून आपलं सादरीकरण असणं महत्वाचं आहे.
या सगळ्यावरून एक लक्षात येते की योग्य ग्रूमिंग हे आजच्या काळाची गरज आहे.

स्त्रियांच्या बाबतीत मेकअप हा अविभाज्य भाग बनला आहे. कुठेही जाताना आज आपण बेसीक मेकअप करूनच बाहेर पडतो. मेकअप करते वेळीही आपण कुठे चाललो आहे, तिथे आपण काय निमित्ताने चाललो आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे आपण घातलेला पोशाख, आपला स्किन टोन याला साजेसा मेकअप असणेही गरजेचे आहे. मेकअप किती हलका आणि किती गडद हवा हा जरी ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय असला तरीही तो दिवस आहे कि रात्र, formal आहे की casual याचा विचार करून असावा.
या सगळ्यावरून एक लक्षात येते की योग्य ग्रूमिंग हे आजच्या काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment